
मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या गयाळवाडी-खेडशी येथील रेल्वे ब्रीज जवळ देशी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर शंकर कांबळे (वय ५०, रा. पानवल, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.२०) दुपारी बाराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित प्रौढ सार्वजनिक ठिकाणी देशी दारु पित असताना आढळला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर साळवी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




