मंडणगड येथील अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…


दापोली
पालघर ते कुंबळे दरम्यान राज्यमार्गावर १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडे आठ वाजता झालेल्या अपघातात कल्पेश प्रकाश आदावडे (वय ३५, मूळ राहणार चिखलगाव, तालुका दापोली) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर विलास पांडुरंग मोहिते (वय ४८, ) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातासंदर्भात विलास मोहिते यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवली आहे. पालघर ते कुंबळे दरम्यान १९ एप्रिल रोजी सकाळी साडे आठ वाजता एम.एच. ०८ ए.बी. ४४२२ या दुचाकी गाडीवरील चालक कल्पेश आदावडे याला झोपेची डुलकी येत असल्याने त्याने आपल्या ताब्यातील दुचाकी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता, अतिवेगाने बेदरकारपणे चालवली. यामध्ये दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूस बाहेर खड्ड्यात जाऊन अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार कल्पेश आदावडे हा स्वतःच्या मृत्यूस तसेच फिर्यादीच्या अपघातास कारणीभूत ठरला. या फिर्यादीनंतर दुचाकीस्वाराविरोधात मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button