
पनीर’बद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय, हॉटेलचालकांना कडक आदेश,
हल्ली कोणत्या गोष्टी काय भेसळ असेल हे ओळखणे पार कठीण झाले आहे. खास करून खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. त्यामुळेच आता राज्या सरकारने हॉटेल, रेस्टारंट, फास्ट फुड विक्रेत्यांना पनीरचे पदार्थ विकत असताना आता स्पष्टपणे दुधापासून तयार झालेले पनीर असा उल्लेख मेनू कार्डवर करावा लागणार आहे.जर एखादा हॉटेलचालक चीज अॅनालॉग (Cheese analogue) पनीर विकत असेल तर तसा उल्लेख मेनू कार्डवर करावा लागणार आहे, असा आदेश राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. पनीर फक्त दुधापासून आणि अॅनालॉग वेगळ्या घटकांपासून तयार होत असतं. त्यामुळे आता रेस्टॉरंट, हॉटेल्सला बिल, मेनूकार्डवर “चीज, पनीर अॅनालॉग” स्पष्ट नमूद करणे बंधनकारक असणार आहे. चीज अॅनालॉगवर उत्पादक, पुरवठादारांनीही योग्य लेबलिंग करणे आवश्यक आहे. जर लेबलिंग आणि माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.




