
दीड वर्षानंतरही उसने दिलेले पैसे, दागिने न मिळाल्याने महिला छेडणार उपोषण
राजापूर तालुक्यातील साखर आंबेरकोणी येथील रवींद्र पुनाजी राडये व ऋतिका रवींद्र राडये यांना उसने म्हणून दिलेले पैसे अद्यापही परत केले नाहीत. त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीचीही दखल घेतली गेली नाही. तरी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे संगीता अशोक धुमाळ यांनी लेखी तक्रार केली आहे. आपल्याकडूनही न्याय न मिळाल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
संगीता धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये रवींद्र पुनाजी राडये व ऋतिका रविंद्र राडये यांना मदत म्हणून दागिने व पैसे विश्वासाने दिले होते. परंतु या दोघांनी माझा विश्वासघात करून आज देतो, उद्या देतो असे सांगून मला आशेवर ठेवले आहे. मी त्यांचेकडे वारंवार दागिने व पैशाची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असून जिवे मारण्याच्या धमक्याही देत असल्याने आपण नाटे पोलीस स्थानकात तक्रार केली असता पोलिसानी फक्त चॅप्टर केस दाखल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
www.konkantoday.com




