
जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 मे रोजी
रत्नागिरी, दि. 23 ):- जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. त्यानुसार माहे मे 2026 चा लोकशाही दिन सोमवार 4 मे रोजी दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील सभागृहात होणार आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांना प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात.




