
खेड येथे शिवसेनेची बी.एल.ए. आढावा बैठक उत्साहात; बूथ मजबूत करण्यावर भर

खेड : शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या आढावा बैठकींच्या पार्श्वभूमीवर खेड येथील वैश्य भवन येथे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) आढावा बैठक नामदार मा. श्री. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली.
या बैठकीत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अपूर्ण, चुकीच्या किंवा बनावट नोंदी वगळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले.


बूथ स्तरावर संघटना अधिक सक्षम करण्यासाठी बीएलओंसोबत समन्वय राखणे, तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दक्ष व प्रशिक्षित बी.एल.ए. नियुक्त करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथ मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकासाच्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. शासनाच्या योजनांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले.
या बैठकीस शिवसेना उपनेते श्री. संजय कदम, रायगड लोकसभा संपर्क प्रमुख श्री. अनिल नवगणे, जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण तसेच स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



