
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील नाजीण जुनामठ येथे कारच्या धडकेत दोघे तरुण जखमी
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील नाजीण जुनामठ येथे कारच्या धडकेत रस्त्यावरील दोघे तरुण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या घडली. करण सुमारास बाळकृष्ण शिवगण (२५, रा. नाणीज, शिवगणवाडी रत्नागिरी) व प्रथमेश विनोद बेंद्रे (२४, रा. मिरजोळे रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी कारचालक वसिम अब्दुल रेहमान (४० रा. राजीवडा, रत्नागिरी) प्रथमेश व करण हे दोघेही कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील नाणीज जुनामठ येथे थांबलेले होते. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी याने निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्यावरील करण व प्रथमेश यांना जोराची धडक दिली. या घटनेत प्रथमेश व करण यांना दुखापत झाली अशी तक्रार नाणीजचे पोलीस पाटील नितीन कांबळे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दिली. त्यानुसार कारचालक वसिम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com



