उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी प्रायोजित राष्ट्रीय स्वास्थ्य एवं शरीर सौष्ठव महासंघ यांच्या मान्यतेने 1 मे रोजी 72वी राष्ट्रीय फिटनेस आणि शरीर सौष्ठव स्पर्धा


रत्नागिरी : कै.श्रीराम हरी खातू नाट्यमंदिर येथे उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी प्रायोजित राष्ट्रीय स्वास्थ्य एवं शरीर सौष्ठव महासंघ यांच्या मान्यतेने महाराष्ट्र हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेमार्फत 72 वी राष्ट्रीय फिटनेस आणि शरीर सौष्ठव स्पर्धा 2026 चे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते 1 मे रोजी सांयकाळी 5 वाजता होणार आहे.
आमदार किरण सामंत हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे , जिल्हा शल्य चिकित्सक हनुमंत जगताप, उद्योजक रविंद्र (अण्णा) सामंत, नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे, मुख्याधिकारी वैभव गारवे हे प्रमुख पाहणे उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण व समारोप दि. 2 मे रोजी रात्री 8 वाजता होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button