आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन(ॲंन्टी पायरेसी सेल मुंबई) कल्याण येथे आयोजित “भारत सन्मान गौरव पुरस्कार २०२६” सोहळ्यात गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग ऑफिसर इतिशा चौहान, तसेच ॲंन्टी पायरेसी सेल मुंबईचे मुख्य तपासी अधिकारी राम जित (जितु) गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वैष्णवी नेटके यांना त्यांचे गुहागर तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button