
देवरूखात गॅस सिलेंडर टंचाई झाल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक
देवरूख आणि परिसरातील नागरिकांना गॅस सिलिंडर वेळेवर न मिळाल्याबाबत वाढती नाराजी लक्षात घेऊन संगमेश्वर दक्षिण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगराध्यक्षा तसेच महायुतीचे नगरसेवक यांनी संबंधित गॅस एजन्सीकडे थेट जाब विचारला. गॅस वितरणात होणारा अनावश्यक विलंब, नागरिकांना दिली जाणारी उडवाउडवीची उत्तरे वितरण यंत्रणेतील गैरकारभार याबाबत भाजपा पदाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्तकेली. तत्पश्चात तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती देत तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
गॅस ग्राहकांनी सिलिडेर नोंदणी केल्यावर १५-२० दिवस होऊन पण एजेन्सी सिलिंडर घरपोच करत नाहीत व कार्यालयाते २ दिवस उन्हात कूपन देऊन रांग लाऊन पण सिलिंडर मिळत नसल्याची नागरिकांनी तक्रारी केल्या. संगमेश्वर दक्षिण भाजपा पदाधिकार्यांनी एचपी, गॅस एजन्सी धारकाला स्पष्ट सांगितले की, जनतेला मूलभूत सुविधा वेळेवर मिळणे ही एजन्सीची जबाबदारी असून गॅससारख्या अत्यावश्यक सेवेत कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा सहन केली जाणार नाही. तहसीलदार तसेच पुरवठा विभागाकडेसुद्धा तातडीने चौकशी करून गॅस वितरणातील दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच नागरिकांना नियमित आणि वेळेवर गॅस पुरवठा सुनिश्चित करावा, अर्शी मागणी करण्यात आली.
www.konkantoday.com




