
रत्नागिरी जिल्ह्याने जीएसटीचे उद्दिष्ट मोडले
रत्नागिरी जिल्ह्याने आर्थिक क्षेत्रात आपल्या यशाचा आलेख उंचावत गेल्या आर्थिक वर्षात वस्तू व सेवाकर संचालनालयाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कित्येक पटीने अधिक महसूल गोळा केला आहे. जिल्ह्याला मिळालेले ४७१ कोटी १७ लाखांचे उद्दिष्ट मोडीत काढत, तब्बल ५३४ कोटी ६७ लाखांचे उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा झाले असल्याची माहिती वस्तू व सेवाकर संचालनालयाचे जिल्हा उपायुक्त यांच्या विभागाकडून देण्यात आली आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी शासनाने रत्नागिरी जिल्ह्याला ४७१ कोटी १७ लाखांचे लक्ष्य दिले होते. मात्र, वस्तू व सेवाकर विभागाच्या चोख नियोजनामुळे आणि व्यापार्यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याने हे लक्ष्य सहजरीत्या पार केले. विशेष म्हणजे, निर्धारित उद्दिष्टापेक्षा ६३ कोटी ४१ लाख रुपये जादा महसूल मिळवून देऊन रत्नागिरीने राज्याच्या उत्पन्नात मोलाचा वाटा उचलला आहे. राज्याच्या एकूण उत्पन्नात जीएसटीचा बाटा ६५ टक्के आहे, त्यात रत्नागिरीची ही कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.
www.konkantoday.com




