बापाची निर्घृण हत्या, घरावर दु:खाचा डोंगर तरी लेकीने दिली बारावी, सं

संतोष देशमुखांच्या मुलीला मिळाले ‘इतके’ टक्के मार्क!*. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली हे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. याप्रकरणी वाल्मिक कराड आणि टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील न्यायालयीन प्रक्रीया सुरु आहे.वडीलांची हत्या झाली त्याच काळात बारावीची परीक्षा होती. घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना संतोष देशमुखांची लेक वैभवीने परीक्षा दिली होती. आज बारावीचा निकाल

समोर आलाय. त्यात वैभवी संतोष देशमुख यांच्या निकालाचीही चर्चा होतेय. तिचं कौतुक केलं जातंय.मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची लेक बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. नुसती उत्तीर्णच नव्हे तर तिला तब्बल 85.33 टक्के इतके गुण मिळाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. निकाल असल्याने वैभवी वडिलांच्या आठवणीने भावुक झालेली दिसली. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाही, याचं दु:ख होतं, अशी प्रतिक्रिया वैभवीने दिली. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच लागल्याची भावनादेखील यावेळी तीने व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button