
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मध्यस्थी केल्याने लोटे एमआयडीसीतील टपरीधारकांना तूर्तास दिलासा…
लोटे लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील अनधिकृत बांधकामे आणि टपर्या चालविणार्या मालकांना तूतास तरी दिलासा मिळाला आहे. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मध्यस्थी करून एमआयडीसीच्या अधिकार्यांना तूर्तास कारवाई थांबवा, चर्चेतून मार्ग काढू अशा सूचना केल्या आहेत. लोटे येथील उद्योग भवन येथे पचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित एमआयडीसी, उद्योजक संघटना आणि टपरीधारक यांच्या संयुक्त बैठकीत गीते यांनी एमआयडीसीच्या अधिकार्यांना तशा सूचना केल्या. महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या औद्योगिक वसाहती मधील अनधिकृत बांधकामे आणि टुपया हटविण्याचे काम सुरू असून खडपोली, खेर्डी, खडपोली इत्यादी ठिकाणी ही धडक मोहीम एमआकडीसी कडून राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी एमआयडीसी कडून नोटिसा मिळालेले लोटे एमआयडीसीतील बांधकामे व टपरी धारक चिंतेत होते. लोटे येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गोवळकर यांनी काही टपरी चालकांना घेऊन मुंबई येथे जाऊन माजी केंद्रीय मंत्री श्री. अनंत गीते यांची -भेट घेतली व टपरी धारकांच्या भावना सांगितल्या.
www.konkantoday.com




