
जिल्हा परिषद, आरोग्य समितीच्यावतीने आदर्श डॉक्टर, उत्कृष्ट आरोग्य केंद्र पुरस्काराने होणार
रत्नागिरी जिल्हयाच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख व्हावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य समितीने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उत्कृष्ट रुग्णसेवा देणारे वैद्यकीय अधिकारी आणि सर्वाधिक रुग्ण तपासणी करणार्या आरोग्य केंद्रांना आता ’आदर्श डॉक्टर’ व ’वादर्श प्राथमिक आरोग्य केंद्र’ या पुस्कारांनी गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य समितीचे सभापती विलास चाळके यांनी सोमवारी दिली.
चाळके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक पुरस्काराच्या धर्तीवर आता आरोग्य विभागातही ही स्पर्धात्मक प्रोत्साहन प्रणाली राबवली जाणार असल्याचे चाळके यांनी सांगितले. आरोग्यासाठी निधीची कमतरता भासू नये याकरिता पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे विशेष पाठपुरावा करण्याचा निर्णयही कावेळी घेण्यात आला.
या बैठकीला विक्रांत जाधव संतोष थेराडे, पूजा निकम यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.www.konkantoday.com




