
वरवेली येथील नमन कलाकार, उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम दौलत रांजाणे यांचे निधन
आमदार भास्कर जाधव यांनी वरवेली निवासस्थानी जाऊन केले कुटुंबीयांचे सांत्वन
गुहागर तालुक्यातील वरवेली रांजणेवाडी येथील राजहंस नमन मंडळाचे प्रमुख पदाधिकारी तसेच उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम दौलत रांजाणे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी नुकतेच निधन झाले. या निधनाची वार्ता गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना कळताच ते गुहागर दौऱ्यावर आले असता त्यांनी वरवेली येथील (कै.) शिवराम रांजाणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी रांजाणे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी आमदार जाधव यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक मुळ्ये, युवक कार्यकर्ते सोहम साथार्डेकर, आमदार जाधव यांचे स्वीय सहाय्यक संतोष तांदळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




