रात्री ५ तास वीस टनापर्यंतच्या वाहतुकीस परवानगी, गाणे-खडपोलीतील उद्योजकांना दिलासा


चिपळूण तालुक्यात पिंपळी येथील जुना पुल खचल्यानंतर गाणे-खडपोली एमआयडीसीतील अवजड वाहतूक पूर्णतः बंद पडल्याने आता त्यावर पर्याय म्हणून बुधवारी येथील प्रांत कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार २० टनापर्यंतची वाहने रात्री ते पहाटे ५ वाजेपर्यंत शिरगांव-पेढांबे मार्गे गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीत येणार असून जाताना ती वालोटीमार्गे सोडली जाणार आहेत. अशा पद्धतीने बुधवारी रात्रीपासून वाहतूक सुरू झाली असून उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button