.. अन्यथा सरकारला कोर्टात खेचणार


लोकांच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस राबणार्‍या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांवर वयाच्या ६० व्या वर्षी अन्याय का? असा संतप्त सवाल करत महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेने राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. निवृत्तीचे वय ६५ वर्षे करा किंवा सन्मानजनक पेन्शन लागू करा, अन्यथा थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा कडक इशारा संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेने शुक्रवारी जिल्हा परिषदेवर प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार धरणे आंदोलन केले. राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत कायंरत असलेल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिलांना वयाची ६० वर्षे पूर्ण होताच सेवेतून कमी करणे हा त्यांच्या घटनात्मक हक्काचा भंग असल्याचा जोरदार आक्षेप महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेने घेतला आहे. त्यांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे किंवा त्यांना दरमहा ५ हजार रुपये पेन्शन लागू करावी, अशी आग्रही मागणी या संघटनेने केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button