रत्नागिरी शहरानजी कारवाचीवाडी येथे लागलेल्या आगीत नळ पाणी योजनेचे पाईप भस्म सात


रत्नागिरी शहर परिसरात गेल्या आठ दहा दिवसात आग लागण्याच्या घडल्या असून आज रत्नागिरी शहरातील कारवाची वाडी, श्रीनगर परिसरात अचानक लागलेल्या आगीत नळपाणी योजनेचे पाईप जळून खाक झाले आहेत. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
काल दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते. वणव्याने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत जवळपास एक तासानंतर आग आटोक्यात आणली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button