
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी बसवण्याच्या मोहिमेत रत्नागिरीकर सर्वात पुढे
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी बसवण्याच्या मोहिमेत रत्नागिरीकर सर्वात पुढे आहे. जिल्ह्याने आघाडी घेतली असून नोंदणीकृत असलेल्या 2 लाख 11 हजार 423 वाहनांपैकी 1 लाख 15 हजार 534 वाहनांवर एचएसआरपी नंबर बसवण्यात आल्या आहेत तर 24 हजार 74 वाहनांनी नंबर प्लेट बुकींग केली आहे.एकंदरीत,एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात रत्नागिरी राज्यात अव्वल ठरले असल्याचे सांगण्यात आले.उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांची सुरक्षा वाढते आणि गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यामुळे राज्याच्या परिवहन विभागाने 1 एप्रील 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट सक्तीची करण्यात आली आहे. राज्यभरात पहिली मुदत दिली होती. मात्र कमी प्रतिसाद मिळाला असून पुन्हा दुसर्यांदा 30 नोव्हेंबरपर्यंत नंबरप्लेट बसवण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे




