प्रसिद्ध क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे कुटुंबासह गणपतीपुळ्यात


जग प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेला भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने मंगळवारी देत स्वयंभू श्रींचे कुटुंबीयांसमवेत दर्शन घेतले.या भेटीत रहाणे याचा संस्थान श्री देव गणपतीपुळे पंच कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी रहाणे याने गणपतीपुळे मंदिरातील पुजारी देवस्थानचे पंच, पुजारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तसेच, रहाणे याची भेट होताच गणपती मंदिरात उपस्थित असलेल्या भाविक व पर्यटकांनी आणि देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यासमवेत छायाचित्रे घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button