चिपळूण नगर परिषदे कडून अभिनेते ओंकार भोजने यांची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती


स्वच्छ भारत मिशन – शहरी’अंतर्गत चिपळूण नगरपरिषदेने सामाजिक भान जपणाऱ्या आणि अभिनय क्षेत्रात स्वतःची छाप पाडलेल्या अभिनेते ओंकार भोजने यांची स्वच्छतादूत (ब्रॅण्ड ॲम्बेसेडर) म्हणून नियुक्ती केली आहे.नगर परिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी भोजने यांना नियुक्तिपत्र देताना सांगितले की, चिपळूण शहरात स्वच्छताविषयक जनजागृती करण्यासाठी सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींचा सहभाग अत्यावश्यक आहे. ओंकार भोजने हे युवा, तरुण तसेच वृद्धांचेही आवडते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रतिमेमुळे स्वच्छता मोहिमेला नवी दिशा व ऊर्जा मिळेल.

मूळचे चिपळूणचेच असलेल्या ओंकार भोजने यांनी छोट्या पडद्यावर स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विनोदी अभिनेता म्हणून स्वत:ला वेगळी ओळख मिळवली आहे. अल्पकाळातच त्याचा चाहता वर्ग वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या सहभागातून लोकसहभाग वाढवून चिपळूण शहर अधिक स्वच्छ आणि अधिक सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button