निवडणूक कालावधीमध्ये जात/धर्म/भाषावार शिबीर आयोजनास निर्बंध


रत्नागिरी, दि. 15 ) : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी कार्यक्रम 13 जानेवारी 2026 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात/भाषा / धार्मिक शिबीरांचे / मेळाव्यांचे आयोजनावर जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात/भाषा/धार्मिक शिबीरांचे/मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत) निर्बंध घातले आहेत.
प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन प्रसिध्दी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button