
अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.
मृताचे वय ४० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. अंगावर चॉकलेटी रंगाचा शर्ट, फुल पॅन्ट परिधान केली आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.www.konkantoday.com




