
एसटी मधून प्रवास करणाऱ्या तरुणीची छेडछाड करणारा दापोलीतील तो वाहक अखेर निलंबित
एसटी मधून प्रवास करणाऱ्या तरुणीची छेडछाड करणाऱ्या दापोली आगारातील वाहकाला अखेर निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
या वाहकाने एसटी मधून प्रवास करणाऱ्या स्त्रिया व महिलांची छेडछाड केल्याच्या तक्रारी येत होत्या मात्र समाजाच्या भीतीमुळे कोणी तक्रार करण्यास पुढे येत नव्हते याबाबत ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर व माजी नगराध्यक्ष ममता मोरे यांनी पुढाकार घेऊन या वाहकावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता त्याची दखल घेऊन या वाहकाला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला




