सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे सुरूंग लावण्याच्या तयारीत


सिंधुदुर्गात महायुतीतील वाद थांबवण्यासाठी जेष्ठ नेते नारायण राणे आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर प्रयत्न करताना दिसत आहे. नारायण राणे यांनी तर महायुती म्हणून न लढल्यास शिवसेनेशी संबंध तोडू असा निर्णयच बोलून दाखवला होता. त्यानंतर केसरकर यांनी किमान आपल्या सावंतवाडी मतदारसंघात युती टिकावी म्हणून भाजपशी चर्चा सुरू केली आहे. दोन फेऱ्या झाल्या असून अद्याप निर्णय झालेला नाही. तर येथील नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडावे अशी मागणी केसरकर यांनी केली आहे. पण आता वडील नारायण राणेंसह केसरकर यांच्या प्रयत्नांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरूंग लावल्याचे समोर येत असून भाजपकडून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केल्याचे येथे बोलले जात आहे. यामुळे महायुतीत पुन्हा खळबळ उडाली आहे.

पालकमंत्री नितेश राणे सोमवारी (ता.10) सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह सध्या घोषणा झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. तर हा दौरा खासदार नारायण राणे यांनी महायुतीबाबत केलेल्या भूमिकेनंतर असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ते कोणता निर्णय घेतात याकडे देखील शिवसेनेचे लक्ष लागले होते. त्याप्रमाणे नितेश राणे यांनी आपल्या दौऱ्यात भाजप कार्यालयात आणि त्यानंतर राजवाड्यावर बंद दाराआड चर्चा करत युतीबद्दल चर्चा केल्याचे कळत आहे. तसेच त्यांनी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button