
कोकण रेल्वे मार्गावरील ४३,८९६ फुकट्या प्रवाशांकडून २ कोटी, ४५ लाखांचा दंड वसूल
कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणार्या रेल्वे गाड्यांमधून फुकट प्रवास करणार्या ४३,८९६ प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने २ कोटी ४३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेच्या तिजोरीत यामुळे भर पडली आहे. वर्षभरात ३,६८,९९१ प्रवासी कारवाईच्या कचाट्यात सापडल्याची माहिती रेल्वे प्रवाशांकडून प्राप्त झाली.
कोकण रेल्वेच्या मार्गावरून नियमित धावणार्या रेल्वेगाड्या स्पेशल रेल्वे गाड्यातून काही प्रवासी फुकट प्रवास करीत असल्याची बाब निदर्शनास आली असून रेल्वे प्रशासनाने भरारी पथकाच्या माध्यमातून तिकिट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. फुकट प्रवास करणार्या प्रवाशांना लगाम लागण्याचे भरारी पथक करीत आहे. भरारी पथकाद्वारे तिकिट तपासणी मोहीम गतीमान करण्यात आली आहे. फुकट्या प्रवाशांमध्ये परप्रांतीय प्रवाशांचा अधिक कल असल्याचे आढळून आले आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर कोणत्याही स्टेशनवर काणत्याही भरारी पथक होत तिकिट तपासणी मोहीम हाती घेत असल्याने फुकट्या प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाली आहे.
मांडवी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, तुतारी एक्सप्रेसमधून फुकटे प्रवासी प्रवास करत असल्याची बाब पुढे आली आहे. विनातिकिट प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणार्या प्रवाशांचीही संख्या अधिक आहे. डिसेंबर महिन्यात अधिक ४३,९८६ फुकट्या प्रवाशांना दणका रेल्वे प्रशासनाने दिला आहे. तिकिट तपासणी मोहिमेतून फुकट्या प्रवाशांकडून २० कोटी २७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून यापुढे तिकिट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.
www.konkantoday.com




