
कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ’केवायसी’ची पूर्तता करण्यासाठी गर्दी उसळली
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ घेणार्या लाभार्थीना ई केवायसी करण्याची सक्ती करण्यात आल्याने राजापुरातील प्रयाग एजन्सी केंद्रावर गर्दी उसळली होती. शासनाच्या या निणर्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत होता.
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. गृहोपयोगी संचामध्ये विविध १७ प्रकारामधील एकूण २० वस्तूंचा संच कामगारांना वितरण करण्यात येतो. यापूर्वी सध्या असलेल्या प्रयाग एजन्सी केंद्रामधून सुमारे १० हजार कामगाराना गृहोपयोगी संचाचे वाटप करण्यात आले. तर सुमारे १४ हजार कामगारांनी सध्या संबंधित विभागाकडे कामगार म्हणून नोंद केली आहे. यापूर्वी नोंद करताना केवायसी केली जात होती. कामगार नोंदणी करताना केवायसी करण्यासाठी लागणार्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असताना पुन्हा एकदा केवायसी क़रण्याचे आदेश दिल्याने कामगारामधून नाराजी व्यक्त करण्यात येत असून संताप व्यक्त केला जात आहे.
www.konkantoday.com




