इन्सुलीत बेकायदा दारुसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त तीन चारचाकी वाहने ताब्यात : तिघांवर गुन्हे दाखल

ज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील तपासणी नाक्यावर गुरुवारी दिवसभरात तीन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या.गोव्याहून महाराष्ट्रात अवैधपणे वाहतूक केली जाणारी विदेशी दारू आणि तीन चारचाकी वाहने असा एकूण २० लाख ५९ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

इन्सुली तपासणी नाका पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गोव्याकडून महाराष्ट्रात येणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी तीन वेगवेगळ्या वाहनांमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे एकूण ३३ बॉक्स (१०८६ बाटल्या) सापडले. या मद्याची किंमत ४ लाख ९ हजार ८० रुपये इतकी आहे.तपासणीदरम्यान हुंदाई अल्काझार कार (एमएच ०९ जीएम ७३७५) चालक संकेत प्रकाश वीर (रा. गारगोटी, जि. कोल्हापूर), हुंदाई सँट्रो (एमएच ०९ एक्यू ४४९६) चालक अनिल माणिकराव खैरमोडे (रा. सांगली) आणि इनोव्हा कार (एमएच १४ डीएन ०३२४) चालक गणेश शंकर भास्कर (रा. करवीर, जि. कोल्हापूर) या तिघा संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही वाहनांची अंदाजे किंमत १६ लाख ५० हजार रुपये आहे. मद्य आणि वाहने असा मिळून एकूण २० लाख ५९ लाखांचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button