राजापूर तालुक्यातील नाणार येथे दिवसा घरफोडी, १२ हजारांचा ऐवज लंपास


राजापूर तालुक्यातील नाटे-नागर भटवाडी येथे चोरट्याने भरदिवसा घराचा मुख्य दरवाजाचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उचकटून चोरट्याने सुमारे १२ हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी घडली. याबाबत लता वासुदेव साईम (६५, सेवानिवृत्त, रा. नाणार भटवाडी, ता. राजापूर) यांनी नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर बेडरूममधील कपाट उचकटून त्यातील चांदीचे साहित्य चोरून नेले. चोरट्याने सुमारे ४ हजार ५०० रुपये किमतीचे हळदी-कुंकवाचे चांदीचे भांडे तसेच सुमारे ७ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे निरंजन, असा एकूण सुमारे १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे. नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button