
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मुंबई-गोवा महामार्गावरील ५ अपघातप्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांच्या सुखकर प्रवासासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील हद्दीतील ५ अपघातप्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये कशेडी बोगदा, वेरळ फाटा, भोस्ते घाट, बोरज टोलनाका, लोटे एमआयडीसी यांचा समावेश आहे. अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
कशेडी बोगद्यात दरवर्षी चाकरमान्यांच्या मार्गात ’विघ्न’ उभे ठाकते. यंदा गणेशभक्तांची यातून काहीअंशी सुटका झाली आहे. दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू असल्याने गणेशभक्तांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी झाला आहे. मात्र, तरीदेखील बोगद्यातील खंडित होणार्या वीजपुरवठ्यासह ’गळत्यांचे ’विघ्न’ निर्माण होवू नये, याकरिता राष्टीय महामार्ग खात्याला सतर्कतेचे निर्देश दिले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग खात्याने दोन्ही बोगद्यात सुसज्जता ठेवली आहे.www.konkantoday.com




