
सिंधुदुर्ग जिल्ह्यातओंकार’ हत्तीचा मडुरा गावात अक्षरशः धुमाकूळ , गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
सिधुदुर्ग जिल्ह्यात जंगली हत्तींचा उपद्रव काही नवीन नाही, पण गेल्या काही दिवसांपासून ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने मडुरा गावात अक्षरशः धुमाकूळ घातल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या हत्तीने गावात घुसून शेतीचे नुकसान करण्यासोबतच आता थेट घराशेजारी उभ्या असलेल्या मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.




