
जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा २०२६ चे अजिंक्यपद रत्नागिरीच्या साईप्रसाद साळवी याने पटकावले.
रत्नागिरी : शहरातील माधवराव मुळये भवनात आयोजित करण्यात आलेल्या मारुती कॉमन क्लब, खालची आळी गणेशोत्सव मंडळ आयोजित
जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा २०२६ चे अजिंक्यपद रत्नागिरीच्या साईप्रसाद साळवी याने पटकावले.
अंतिम फेरीतील डावात काळ्या मोहऱ्यांने खेळणाऱ्या साईप्रसाद साळवी ने अलिक गांगुली विरुद्ध विजय मिळवून एकूण ६.५ गुणांसह एकुण सात फेऱ्यांत प्रथम स्थान प्राप्त केले. साहस नारकर व सोहम रुमडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त केले.
सातव्या फेरीतील एका उत्कंठावर्धक डावात सोहम रूमडे याने सौरिश कशेळकरचा पराभव केला.
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ सुरेश भाटवडेकर, सतीश बाम, विजय पेडणेकर, संतोष सिधये, व लक्ष्मण जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :
खुला गट क्रमांक चार ते बारा : सौरिश कशेळकर, प्रवीण सावर्डेकर, श्रीहास नारकर, अलिक गांगुली, वरद पेठे, सचिन टोकळे, शुभंकर सावंत, अनंत गोखले, सचिन पाटिल
वयोगट पारितोषिके :
वयोगट ३६-५५ प्रथम : विवेक जोशी.
वयोगट ३६-५५ द्वितीय : मिलिंद नरवणकर
वयोगट १८–३५ प्रथम : शरीफ सोलकर
वयोगट १८–३५ द्वितीय : लवेश पावसकर
महिला खेळाडू प्रथम : तनया आंब्रे
महिला खेळाडू द्वितीय : सान्वी दामले
सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू प्रथम : अनिश दाते.
सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू द्वितीय : सुहास कामतेकर
१५ वर्षांखालील गट :
मुले – सहर्ष टोकळे, आयुष रायकर, ओम उत्तेकर
१२ वर्षांखालील गट :
मुले – सोहम कोरवार, विराज बनसोड, रूद्र जोशी.
९ वर्षांखालील गट :
मुले – आरव निमकर, ईशान जोशी .
स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून तब्बल १५ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित बुद्धिबळपटूसह एकूण ८० खेळाडू सहभागी झाले.
स्पर्धेचे नियोजन व मुख्य पंच कामगिरी विवेक सोहनी यांनी पार पाडली. सहाय्यक म्हणून मानस सिधये व मारूती कॉमन क्लब च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
अशा मोठ्या स्वरूपाची बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्याबद्दल जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून मारूती कॉमन क्लबचे आभार मानण्यात आले.




