
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कर्दे ग्रामपंचायतीकडून पावले उचलली गेली
दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता पर्यटकांची सुरक्षितता, ग्रामस्थांची शांतता तसेच पर्यारवण संरक्षण या दृष्टीने कर्दे ग्रामपंचायतीच्यावतीने महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारी घडणार्या पर्यटनांच्या पार्श्वभूमीवर सरपंच सचिन तोडणकर यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे समुद्रकिनारी शिस्त, सुरक्षितता व स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.
मार्गदर्शक सूचनांनुसार हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या येथे येणार्या पर्यटकांची ओळखपत्रे घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही अनुचित प्रकारास आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांनी पार्किंगची व्यवस्था स्वतःच्या जागेतच करावी, जेणेकरून सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.www.konkantoday.com



