मागील दोन महिन्यात महावितरणच्या ५८,१६७ ग्राहकांनी घरबसल्या आपल्या नावात बदल करून घेतला.


वीज जोडणीच्या नावातील बदलाच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा महावितरणने सुरू केल्यानंतर राज्यातील वीज ग्राहकांना त्याचा मोठा लाभ झाला आहे. मागील दोन महिन्यात ५८,१६७ ग्राहकांनी घरबसल्या आपल्या नावात बदल करून घेतला. त्याचसोबत वीज ग्राहकांना मंजूर भार वाढवून घेण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेचाही १०,४२८ ग्राहकांना लाभ झाला आहे.
जीवनसुलभतेसाठी (ईज ऑफ लिव्हिंग) महावितरणने वीज ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन घ्याव्यात, जेणेकरून वीज ग्राहकांना घरबसल्या सुविधांचा लाभ घेता येईल व त्यांना कार्यालयात जावे लागणार नाही, असा प्रयत्न चालू आहे. त्यानुसार महावितरणने वीज जोडणी नावात बदल आणि मंजूर भार बदल यासाठी ऑनलाईन व झटपट सुविधा उपलब्ध केली आहे. खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीजबिलावरील ग्राहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो. या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाईल ऍप अथवा ुुु.ारहरवळीलेा.ळप या संकेतस्थळावर वीजग्राहकांना अर्ज सादर करता येतो. ग्राहकाला कोणत्या कारणासाठी नाव बदलणे आवश्यक आहे, त्याचा पर्याय निवडला की, त्यानुसार आवश्यक ते निवडकर दाखले जोडावे लागतात. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया शुल्य भरल्यानंतर तीन ते सात दिवसात नवीन बदलाची प्रक्रिया पूर्ण होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button