आणि स्मशानभूमीत ऐकू आले मंगलाष्टकाचे सूर!


ज्या स्मशानभूमीत केवळ रडण्याचे आवाज ऐकायला मिळतात तिथे मंगलाष्टकाचे सुर ऐकायला मिळाले. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील स्मशानभूमीत हा आदर्श विवाह थाटामाटात पार पडला.ज्या स्मशानभूमीत आयुष्याचा शेवट होतो तिथेच या जोडप्याने आपल्या सहजीवनाची सुरूवात केली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील राहता स्मशानभूमीत हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला.स्मशानभूमीत गेल्या 20 वर्षापासून काम करणारे गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानभूमीतच लावला.स्मशानभूमीला अनेकजण अशुभ मानतात, मात्र याच स्मशानभूमीत विवाहाचे सर्व संस्कार पार पडले. अगदी थाटामाटात दोघांचा विवाह लावण्यात आला.

विषेश म्हणजे जातीपातीची बंधने झुगारून सुशिक्षित तरूणाने म्हसनजोगी समाजातील मुलीशी विवाह करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button