रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तब्बल २३ हजार बोगस मतदार

शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप.

रत्नागिरी : देशात मतदान चोरीचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरीत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेला घाम फोडला आहे.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तब्बल २३ हजार बोगस मतदार असल्याचा खळबळजनक आरोप उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी ३ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत केला आहे. केला. हे २३ हजार बोगस मतदार नावे रद्द करत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ देणार नाही, असा इशारा बाळ माने यांनी दिला. तसेच बोगस मतदार यादी पेन ड्राईव्हतून त्यांनी पत्रकारांना दिली.उपनेते बाळ माने म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीच्या वेळीच आम्हाला ही माहिती मिळाली होती. आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे आणि निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार करताना बोगस मतदार यादी दिली होती. त्यामध्ये दुबार मतदार नावांचा समावेश होता.” निवडणूक निरीक्षकांनी आमची बाजू ऐकूनच घेतली नसल्याचा आरोप बाळ माने यांनी केला.यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहरसंघटक प्रसाद सावंत, माजी नगरसेविका रशीदा गोदड यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button