महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का! अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट ‘सस्पेंड’; राजकीय वर्तुळात खळबळ!


काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक सस्पेंड करण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नेमकं अकाउंट कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आलं, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, तांत्रिक कारणं किंवा मोठ्या प्रमाणात झालेल्या तक्रारींमुळे ही कारवाई झाल्याची चर्चा सुरू आहे.

काँग्रेसकडून हे अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पक्षाच्या सोशल मीडिया टीमकडून इन्स्टाग्राम प्रशासनाशी संपर्क साधला जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेस नेत्यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप आहे की, भाजपविरोधात सातत्याने टीका आणि पोस्ट केल्या जात असल्याने सुडबुद्धीने अकाउंटवर कारवाई करण्यात आली. अनेक तक्रारी एकाचवेळी नोंदवून अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अकाउंट नेमक्या कोणत्या पोस्टमुळे किंवा कोणत्या नियमभंगामुळे सस्पेंड झाले, याबाबत इन्स्टाग्रामकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे आता राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button