रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-राजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्षराजू भाटलेकर याना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा कोकण विभागाचा पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.राजू भाटलेकर हे गेली पंधरा वर्षे पर्यटन उद्योग वाढीसाठी पर्यटन परिषद, महोत्सव भरवत असून ते रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून अल्पबचत सभागृहात पर्यटन संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी राजू भाटलेकर यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवले.

या कार्यक्रमाला पर्यटन संचालनालयाचे (डीओटी कोकण विभाग, नवी मुंबई) सहसंचालक प्रशांत वाणी, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, कोकणभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख संजय यादवराव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजू भाटलेकर हे गेली अनेक वर्षे पर्यटन उद्योगाकरिता योगदान देत आहेत. पर्यटन गाईड तयार करणे, स्थानिक पर्यटनस्थळांवर सोयीसुविधांसाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करणे, त्याकरिता पर्यटन मंत्र्यांशी कायम संपर्कात राहणारे भाटलेकर यांनी आतापर्यंत भरीव योगदान दिले आहे. २०१२ मध्ये त्यांनी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेची स्थापना केली. त्यामार्फत पर्यटन परिषद, जागतिक पर्यटन दिन महोत्सव यांचे आयोजन केले. पर्यटनस्थळांवर सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बैठका आयोजित करून मदत करतात.पर्यटन महोत्सवामध्ये ते नेहमीच जिल्ह्यातील व शेजारच्या जिल्ह्यांतील यशस्वीपणे वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन करणाऱ्या उद्योजकांना आणून त्यांची व्याख्याने आयोजित करतात. त्यामुळे स्थानिक नवउद्योजकांना पर्यटन म्हणजे काय, त्यात कसे काम करावे, व्यवसाय कसा करावा, नवीन संकल्पना कशा राबवाव्यात याचे योग्य मार्गदर्शन मिळाले. त्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत अनेकांनी पर्यटन उद्योगात पाऊल ठेवले असून त्यांना यश मिळू लागले आहेत. पर्यटन महोत्सव गेली ८ वर्षे ते भरवत आहेत. आता पुढील काळात पर्यटन केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. भविष्यात कोकणातील लोककला पर्यटकांना दाखवण्याचा प्रकल्प सुरू करणार असून त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. पर्यटन वाढण्यासाठी माहिती केंद्राची निर्मिती आणि स्थानिक आंबा, काजूपासून बनवलेल्या पदार्थांची आणि कोकणी जेवणाला बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button