गुहागर तालुक्यातील शृंगारतळी-आबलोली मार्गावरील दुचाकी अपघातात २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी-आबलोली मार्गावरील सुरळ फाट्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.सनी मोहन चव्हाण (२१, रा. शृंगारतळी, विखारेवाडी चाळ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना २१ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता घडली. मृत मयत सनी चव्हाण आपल्या ताब्यातील यामाहा मोटारसायकलने (एमएच ०८/बी.डी.-८७४८) सुहेल इक्बाल मुजावर (२५, रा. शृंगारतळी आझाद मोहल्ला) याच्यासह गुहागर आबलोली मार्गाने जात होते. मोटारसायकल सुरळ फाटा येथे आली असता मोटारसायकलवरील सनी चव्हाण याचा ताबा सुटून मोटारसायकल रोडच्या खाली जात अपघात घडला. यात सनी चव्हाण याला गंभीर दुखापत झाली. तसेच सुहेल यालाही दुखापत झाली. जखमी सनी चव्हाण याचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button