छत्रपती संभाजीराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा ,शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा संगमेश्वरनजीक कसबा येथे उभारण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा ८ सप्टेंबर रोजी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज कसब्यामध्ये काही काळ वास्तव्याला होते यामुळे हा भाग छत्रपती संभाजी राजांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून ओळखला जातो. छत्रपती संभाजी राजांच्या पराक्रमाची माहिती सर्वांना व्हावी व त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.तसेच या परिसराचे सुशोभिकरण व्हावे यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पुढाकार घेतला.या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला हे काम अंधेरीतील प्रसिद्ध मूर्तिकार शिरगावकर यांनी केले.या पुतळ्यासाठीचे २०लाख रुपये पालकमंत्री वायकर यांनी स्वतः दिले व आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळांमधून ८०लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही आता या स्थळाला महत्त्व येणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर,पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button