लांजा येथील १७ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणारा संशयितत तरूण अटकेत

लांजा येथील १७ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणार्‍या संशयिताविरूद्ध लांजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. विकास बबन नेमान (२९, रा. लांजा) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३७६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांकडून विकास याला अटक करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित युवती ही १७ वर्षीय असून जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ती नदीवर कपडे  धुण्यासाठी गेली होती. पीडिता एकटी असल्याचे पाहून विकास नेमान हा त्या ठिकाणी आला. तो तिला नदीलगतच्या झुडुपात घेवून गेला. तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच १९ मार्च २०२४ रोजी विकास याने पीडितेला कॉल करून काजूच्या बागेत बोलावून घेतले. पीडिता बागेत आली असता त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.दरम्यानच्या काळात पीडीतेला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईक तिला डॉक्टरकडे घेवून गेले. त्या ठिकाणी डॉक्टरनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला.तपासणीत पीडिता गर्भवती असल्याचे समोर आले. पीडितेला नातेवाईकांकडून जाब विचारण्यात आला असता तिने सर्व हकिगत नातेवाईकांसमोर कथन केली. नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर पीडितेने विकास याच्याविरूद्ध लांजा पोलिसांत तक्रार दाखल केली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button