
कोकण पट्ट्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे आतापर्यंत हापुसचे 40 टक्के पीक हाताशी
कोकण पट्ट्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे आतापर्यंत हापुसचे 40 टक्के पीक हाताशी आले. यातील 20 टक्के हापूस परदेशात पोहोचला. चढा दर असणारा हापूस आता साडेतीन हजारापर्यंत उतरला असून 15 एप्रिलपर्यंत आवक वाढुन हाच दर एका पेटीमागे दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत उतरणार असल्याने आता सर्वसामान्यांच्या ताटातही आमरस दिसू लागेल.देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथे वातावरणातील बदलांमुळे यंदा वार्षिक उत्पन्न एकरी 2 लाखांऐवजी 1 लाखांपर्यंत खाली आले. वाशी मार्केटला हंगामात देवगड हापूसच्या 10 ते 12 हजार पेट्या येतात. याशिवाय मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव या मार्केटमध्ये दर दिवशी देवगड हापूसच्या 7 हजार ते 8 हजार पेट्या जात असतात. पहिल्या हंगामात हापूसच्या 5 डझनच्या पेटीचा दर 5 हजारपर्यंत असतो. पूर्ण क्षमतेने हापूस बाजारात आला की हा दर दोन हजारांपर्यंत खाली येतो. सध्या देवगड हापूस आंब्याच्या 5 डझनी पेटीचा भाव साडेतीन ते चार हजार रुपये आहे.
www.konkantoday.com