कुरधुंडा येथे डंपर आणि इर्टिगा या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात ८ प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे डंपर आणि इर्टिगा या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात इर्टिगा गाडी मधील ८ प्रवासी जखमी झाले आहेत.सदरचा अपघात रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडला.या अपघातात ज्ञानेश्वर रावजी खांडेकर, आयुष राजेंद्र मोरे सविता ज्ञानेश्वर खांडेकर, आदिनाथ वामन मोरे, रिया राजेंद्र मोरे, अर्चना हरिश्‍चंद्र धावडे, सुमन केशव खांडेकर, आदिती आदिनाथ मोरे हे जखमी झाले आहेत. हे सर्व राहणार खेड येथील आहेत. डंपर चालक वाहिद मिया महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम करत होता. यादरम्यान महेंद्र भरणे हा इर्टिगा गाडी घेऊन जात होता. इर्टिगा गाडी कुरधुंडा येथे आले असता डंपर चालक वाहिद मिया याने चुकीच्या बाजूने जावुन इर्टिगा गाडीला धडक दिली त्यामुळे या गाडी मधील प्रवासी जखमी झाले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button