भटकी कुत्री निर्बिजीकरण व मोकाट गुरांच्या नियोजनासाठी एका वर्षात २५ लाख रुपये खर्च, प्रशासक व लोकप्रतिनिधींमध्ये नवीन वाद


रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकीय राजवटीतील खर्चाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता चक्क ’भटकी कुत्री निर्बीजीकरण’ आणि ’मोकाट गुरांच्या नियोजनासाठी खर्च करण्यात आलेल्या २५ लाख रुपयांवरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. नवनियुक्त मंडळाच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजेश तोडणकर यांनी आकडेवारीनिशी प्रशासनाला धारेवर धरत या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक तोडणकर यांनी प्रशासनाच्या कारभारावरच बोट रोखले. सन २०२१ ते २०२४ या सलग तीन वर्षांच्या काळात कुत्र्यांचे निर्बीजीकरण किंवा मोकाट गुरांच्या प्रश्नावर नगर परिषदेने एक रुपयाही खर्च केला नव्हता. मात्र, २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात प्रशासनाने अचानक २५ लाख रुपये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखवले आहे. तीन वर्षे शांत बसलेले प्रशासन एकाच वर्षात एवढ्या मोठ्या निधीची उधळपट्टी कशी काय करू शकते, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button