
कोकण मार्गावरील ठोकूर स्थानकावरून पॉलीप्रॉपिलीनच्या पहिल्या कंटेनर रेकला दाखविला हिरवा झेंडा
मालवाहतूक पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासह बहुविध वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने कोकण रेल्वेने ठोकूर स्थानकावरून पॉलीप्रॉपिलीनच्या पहिल्या कंटेनर रेकला हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कोकण रेल्वे नेटवर्कवर कंटेनरद्वारे होणार्या वाहतुकीच्या एका नवीन प्रवाहाची सुरुवात झाली आहे.
कंटेनर आणि इतर मालवाहतुकीला सुलभ करण्यासाठी केआरसीएलने सेंटल वेअरहाऊसिंग कॉर्पेरिशनच्या सहकार्याने ठोकूर स्थानकावर अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. या सुविधांमध्ये पक्क्या धक्क्यासह जोडरस्ते, जागदित गोदामे मोकळी साठवणूक यार्ड आणि इतर आधुनिक लॉजिस्टिक सुविधांचा समावेश आहे. यामुळे ठोकूर स्थानक एक सुसज्ज माल हाताळणी टर्मिनल बनले आहे.www.konkantoday.com




