
दापोलीकरांवर पाणीपट्टी व इतर करांचा बोजा, नागरिकांच्यात नाराजी
दापोली नगरपंचायतीची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा कृपा घाग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत पाणीपट्टी व इतर करांमध्ये वाढ करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये पाणीपट्टी तब्बल ६०० रुपयांनी वाढली असून या आधी १,२०० रुपये असलेली पाणीपट्टी थेट १,८०० रुपये झाली आहे. तसेच इतर करांमध्येही २० ते ३० रुपयांनी वाढ झाल्याने शहरवासियांच्या खिशाला भार सहन करावा लागणार आहे.
करवाढीच्या या निर्णयाचे समर्थन करताना नगराध्यक्षा कृपा घाग यांनी आर्थिक ताळमेळ स्पष्ट केला. नगर पंचायतीचे पाणी विभागातून मिळणारे उत्पन्न सुमारे ३३ लाख रुपये आहे, तर पाणीपुरवठ्यासाठी येणारा खर्च हा मिळणार्या उत्पन्नापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. हा आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ही वाढ अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले.www.konkantoday.com




