दापोलीत ईअर इंडसाठी हॉटेल व्यावसायिकांकडे ७० टक्क्याहून बुकींग


यंदाच्या नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या (३१ डिसेंबर) सुट्टीचा हंगाम दापोली आणि परिसरातील पर्यटन व्यवसायासाठी सुगीचा ठरणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. यासाठी आतापर्यंत तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांकडे ७० टक्के बुकींग झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याचबरोबर मत्स्य खवय्यांकडून सुरमय, पापलेट, कोळंबीला वाढती मागणी असून यावर्षीचा पर्यटन हंगाम विक्रमी ठेरल अशी आशा पर्यटन व्यावसायिकांना आहे.
मिनीमहाबळेश्वर म्हणून ओळख असणार्‍या आणि पर्यटनाच्या नकाशांवर ठळकपणे झळकणार्‍या दापोली तालुक्यामध्ये यावर्षी गुलाबी थंडी देखील आपले अस्तित्वं टिकवून आहे. आता शनिवार, रविवार या दोन सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली होती. त्याचरोबर दिवाळीच्या सुट्टीमध्ये देखील पर्यटकांच्या गाड्यांच्या तीन ते चार किलो मिटरपर्यंत रांगा दिसून येत होत्या मुरुड, कर्दै, पाळंदे, हर्णे मार्गावर तर वाहतूक कोंडी होत होती तशीच परिस्थिती नाताळ व थर्टीफर्स्टच्या सुट्ट्यांमध्ये होण्याची शक्यता नाकारत येत नसल्याचे बोलले जात आहे. दिवाळीमध्ये अनेक पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या न मिळाल्याने माघारी परत जावे लागले होते. तर काहींनी गाडीतच मुक्काम केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आत्ता आठ दिवसांवर आलेल्या नाताळ व थर्टीफर्स्टच्या सुट्ट्यांकडे पर्यटन व्यावसायिक लक्ष ठेवून आहेत.
पर्यटन व्यावसायिकांच्या माहितीनुसार, नाताळ आणि थर्टीफर्स्टच्या सुट्यांसाठी हॉटेल आणि रिसॉर्ट बुकींगला सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे ७० टक्के बुकींग पूर्ण झाले आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी पर्यटकांची संख्या सर्वाधिक असणार असल्याचा अंदाज आहे. २० डिसेंबरपासून ते ३ जानेवारीपर्यंत पर्यटकांच्या वाहनांनी दापोलीतील रस्ते गजबजलेले दिसणार आहेत. या वाढलेल्या प्रतिसादामुळे आणि हॉटल आणि रिसॉर्ट बुकींग सुरू झाल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button