दापोली तालुक्यातील मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास


दापोली तालुक्यातील मुगीज कलमपेठ येथे बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ३१ ऑगस्टच्या रात्रीपासून १ सप्टेंबरच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत घडली.

पांडुरंग भिकू झाटे यांच्या बंद घरात प्रवेश करून चोरट्याने लोखंडी कपाटातील लॉकर फोडून सुमारे ८० ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने चोरून नेले. यामध्ये मंगळसूत्रे, सोन्याची चेन आणि हाराचा समावेश आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button