
रानडुकराच्या शिकार प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार
रानडुकराच्या शिकार प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या दोन पसार संशयितांचा वन विभागाच्या पथकाला अद्याप सुगावा लागलेला नाही. दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांचाही कसून शोध घेण्यात येत आहे. लवकरच दोघांच्या मुसक्या आवळण्यात यश येईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले. खेड तालुक्यातील बोरज सीमेवरील माळरान क्षेत्रात रानडुकराची शिकार करत दोन डुक्कर घेवून जात असताना वन विभागाच्या पथकाने बाबू भागोजी शिंदे (माणी-खेड) याच्या मुसक्या आवळल्या होत्या. अन्य दोघेजण निसटण्यात यशस्वी झाले. आठवडा उलटूनही अद्याप दोघांचा थांगपत्ता लागलेला नाही. वन विभागाची पथके दोघांच्याही मागावर आहेत.www.konkantoday.com




