शहरात फिरणार्‍या अनोळखी परप्रांतीयांची चौकशी करावी, भाजपाचे माजी शहराध्यक्ष संदेश आंबेकर यांची मागणी


गेले काही दिवस राजापूर तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांच्या पार्श्‍वभूमीवर राजापूर शहरात पैसे गोळा करण्यासाठी फिरणार्‍या अनोळखी परप्रांतीयांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी जोरार मागणी भाजपाचे माजी शहराध्यक्ष संदेश आंबेकर यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी राजापूर शहरात काही परप्रांतीय मंडळी फिरताना आंबेकर यांना आढळून आली होती. त्यांनी तत्काळ चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात तफावत आढळून आली. कधी राजस्थान तर कधी उत्तर प्रदेशातून आल्याचे त्या परप्रांतीय महिलांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले होते. राजापूर शहरात सलग दोन दिवस त्या महिला पैसे गोळा करण्यासाठी फिरत होत्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button